इंजिनियर ते कोकण समजावणारा Konkani Ranmanus | गोष्ट असामान्यांची भाग ५७ | Prasad Gawade

2023-10-04 11

सावंतवाडी तालुक्यातील, सांगेली गावातील जायपेवाडीत राहणाऱ्या प्रसाद गावडेने आज कोकणी रानमाणूस म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोकणातील पर्यटन, इथली खाद्यसंस्कृती, जीवनशैली, शेती याबद्दलची माहिती प्रसाद आपल्या कोकणी रानमाणूस या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो. चांगल्या पगाराची नोकरी सोडून या इंजिनिअर तरुणाने इको टूरिझमच्या माध्यमातून स्वंयरोजगाराची वाट धरली. कोकणाच्या शाश्वत विकासाबद्दल बोलताना प्रसाद तितक्याच परखडपणे स्थानिक प्रश्नही सर्वांसमोर मांडतो. म्हणूनच तो असामान्य ठरतो. चला, जाणून घेऊया त्याचा हा प्रवास...
#kokan #kokniranmanus #prasadgawde #sawantawadi #kokannature #kokanfood #kokanrecipes #kokanrailways #kokani_jivan #lifestyle #kokan_diary #maharashtranews #maharashtra #india

Videos similaires